जागतिक योग दिन

 जागतिक योग दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ....!!


           आजचा दिवस म्हणजे 21 जून हा दिन उत्तर गोलार्ध मध्ये आपण राहतो त्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस असतो म्हणून हा दिवस साजरा होतो किंवा पाळला जातो .योग करण्यासाठी किंवा योग साधनेसाठी आजचा दिवस भौगोलिक रित्या सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो म्हणून 21 तारीख योग दिनासाठी निवडली गेली आहे.
योग मुळे आपल्या अवयवा मधीलच नाही तर शरीर मन आत्मा यांच्यामध्ये सुद्धा संतुलन योगामुळे राखले जाते,  योगामुळे शारीरिक मानसिक विकारांवर विजय मिळावा जाऊ शकतो.
     शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.
     संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये 11 डिसेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रातील 193 सभासदांपैकी 177 सभासदांनी याला संमती दर्शवली आणि मा. नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव फक्त 90 दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आलेला सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव हा ठरला


योगाची फायदे :- 
  1.  योगामुळे आपल्या शरीरात होणारे बदल त्याचे फायदे लोकांना समजून सांगणे 
  2. योगा द्वारे लोकांना धान लावण्याची सवय लावणे 
  3. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्यासाठी सुद्धा एक दिवस देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
  4.  संपूर्ण जगामधील लोकांना शारीरिक व मानसिक आजारातून दूर करण्यासाठी 
  5. लोकांमध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करणे

योगासने बद्दलची संपूर्ण माहितीची pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.


                                                     
                                                     


योगासनाचे प्रकार :- 












सूर्यनमस्कार  घालण्याची पद्धत  खालील image मधून समजून घ्या व सूर्यनमस्कार घाला. :- 


Post a Comment

0 Comments