जागतिक सूर्यनमस्कार दिन

 जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ....!!



     शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. मस्तकापासून तळपायापर्यंत सर्व विकार नष्ट करण्यासाठी सूर्यनमस्काराचा उपयोग केला जातो. आसने आणि प्राणायाम या दोन्हींचा अंतर्भाव असलेला हा व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते

सूर्यनमस्कार हा सूर्योदय व सूर्यास्त या दोन्हीवेळी घातले जाऊ शकतात. प्रारंभी सूर्याकडे तोंड करून दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करावी. सूर्यनमस्कार घालण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत 12 अंकात व दुसरे पद्धतीत 10 अंकात घातले जाऊ शकतात. सूर्यनमस्कारामध्ये एकूण 10 स्थिती असतात. प्रत्येक स्थितीत एक आसन समाविष्ट असते. म्हणजे पूर्ण सूर्यनमस्कारात 10 आसने असतात. त्यामुळे त्या आसनामुळे शरीराला लाभ होतात. जसे पहिल्या स्थितीला प्रार्थना आसन, दुसऱ्या स्थितीला ताडासन, तिसऱ्या स्थितीत उत्तानाअसन, चौथ्या स्थितीत एकपाद प्रसरणासन, पाचव्या स्थितीला चतुरंग दंडासन, सहाव्या स्थितीला अष्टांगआसन, सातव्या स्थितीला भुजंगआसन, आठव्या स्थितीला अधोमुंख श्‍वासनासन, नवव्या स्थितीला एकपादप्रसरणासन, दहाव्या स्थितीला उत्तानासन. 

सूर्यनमस्काराचे फायदे -
हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. बाहु व कंबर यांचे स्नायू बळकट होतात. सर्व महत्त्वाच्या अवयवांना रक्‍त पुरवठा होतो. पाठीचा कणा, मणका आणि कंबर लवचिक होते. पचनक्रिया सुधारते. मनाची एकाग्रता वाढते. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते. 

योगासनाचे प्रकार :- 




सूर्यनमस्कार  घालण्याची पद्धत  खालील image मधून समजून घ्या व सूर्यनमस्कार घाला. :- 


Post a Comment

0 Comments