मत्ता व दायित्व प्रपत्र -
Assets and Liability form
दिनांक ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून सर्व सरकारी कर्मचारी यांना मत्ता व दायित्व प्रपत्र आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात जमा करायचे करायचे असतात.परंतु बरेच कर्मचारी हे प्रपत्र कार्यालयात जमा करत नाहीत त्यामुळे पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचार्यांना देतांना अडचण निर्माण होऊ शकते.आज या पोस्ट च्या माध्यमातून मत्ता व दायित्व (Assets and Liability) प्रपत्र कसे भरावे ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आपल्याला हे प्रपत्र pdf व word मध्ये डाउनलोड करता येईल.
सर्व सरकारी कर्मचारी बंधू भगिनी मिळणाऱ्या वेतनातून चल किंवा अचल मालमत्ता विकत घेवू शकतो. यासाठी ते कर्ज काढू शकतात. त्यामुळे आपल्याला दरवर्षी 31 मार्च हि तारीखेला अनुसरून आपल्याला तीन प्रकारात माहिती सादर करावी लागते. यात चल प्रपत्र, अचल प्रपत्र, दायित्व प्रपत्र
1. चल मालमत्ता :-
तुमच्या कडे असलेली दागदागिने,रत्न,बँक खात्यातील रोकड,पोस्टातील bonds,पीपीएफ ची रक्कम ,तुमच्या कडे असलेली वाहने,mobile,घरातील सर्व महाग इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा सुद्धा समावेश ह्या मध्ये होत असतो.
2. अचल मालमत्ता :-
अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी हलवता येत नाही.ज्यात तुमचे घर,प्लॉट,flat किंवा दुकान ह्यांचा समावेश होत असतो.अचल मालमत्ता तुमच्या स्वताच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंशपरंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करावयाचा असतो.
3. दायित्व :-
दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे किती कर्ज परत करायचे आहे किंवा कर्मचार्यांवर किती कर्ज आहे हे नमूद करावयाचे असते.
महत्वाचे :-
मत्ता व दायित्व प्रपत्र pdf डाउनलोड करण्यासाठी click here बटनाला क्लिक करा.
मत्ता व दायित्व प्रपत्र word file मध्ये डाउनलोड करण्यासाठी click here बटनाला क्लिक करा.
0 Comments