जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत
बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग-१ मधील, विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी,
निव्वळ रिक्त पदांची यादी,
संभाव्य रिक्त पदांची यादी,
जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे
वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.
सदर प्रणालीचे अनावरण गुरुवार, दि. ०९ जून, २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता
मा. श्री.हसन मुश्रीफ साहेब
मंत्री (ग्रामविकास)
मा.श्री. अब्दुल सत्तार साहेब
राज्यमंत्री, ग्रामविकास
मा.श्री. राजेश कुमार साहेब, अवर सचिव ग्रामविकास
मा.श्री.आयुष प्रसाद साहेब, अध्यक्ष बदली समिती गट
इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कक्ष क्र. ७०२, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात येणार आहे.
तरी सदर ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीच्या अनावरण कार्यक्रमास V.C. द्वारे उपस्थित रहावे, ही विनंती.
TEACHER TRANSFER PROCESS STARTED
या संदर्भात काल 8 जून रोजी निघालेले पत्र डाऊनलोड करण्खायासाठी खालिल चित्राला क्लिक करा.
2 Comments
बदली ऑनलाईन झाल्यास खुप छान
ReplyDeleteबदली gr असेल तर पाठवा प्लीज
ReplyDelete