पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करणे बाबत ची अधिसूचना
शासनमान्य शाळांमधून शिक्षण 2022 - 2023 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या WWW.MSCEPUNE.IN व WWW.MSCEPUPPSS.IN या संकेतस्थळावर दिनांक 16 -11 -2022 रोजी पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेचे सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप ➖
- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असतील.
- प्रत्येक पेपर साठी A, B, C , D त्याच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी साठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय चूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी साठी च्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्याय पैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.


परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेचे सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी
0 Comments