अंतिम चाचणी २०२३-२०२४
संकलित गुणनोंद तक्ते
इयत्ता - तिसरी
| अंतिम चाचणी 2024 गुणनोंद तक्ते
चाचणीबद्दल थोडक्यात माहिती -
STARS प्रकल्पामधील SIG 2 (Improved Learning Assessment systems) 2.2 अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येणार आहे. यास अनुसरून 2023-24 या शैक्षणिक वर्षांत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते आठवीतील आसकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्याथ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
अंतिम चाचणी गुणनोंद तक्ते excel / pdf |
0 Comments