इयत्ता 5 वी साठी गुणपत्रक | वार्षिक परीक्षा | पुनर्परीक्षा बाबत मार्गदर्शक सूचना | sanklit board exam 5 th |

 


सदरील गुणपत्रक कोणीही पूर्व परवानगी शिवाय आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर ठेऊ नये. 

इयत्ता 5 वी गुणपत्रक  आपण खालील click here बटनाला क्लिक करून डाउनलोड करू शकता.

                                                     


वार्षिक परीक्षा गुणपत्रक

इयत्ता 5 वी 8 वी   

इयत्ता 5 वी

ब्लँक अँड व्हाईट

Click Here

इयत्ता 5 वी रंगीत  

Click Here


महत्वाचे :-  या गुणपत्रकाची word फाईल हवी असेल तर 9130040800 या नंबर वर 50 रु फोन पे करावे. त्याचा स्क्रीन शॉट याच नंबर वर टाकावा. आपणास word फाईल मिळून जाईल. 


इयत्ता 5 वी रंगीत गुणपत्रक नमुना 




इयत्ता 5 वी Black and White गुणपत्रक नमुना 

इयत्ता 5 वी व 8 वी साठी गुणपत्रक नमुना वार्षिक परीक्षा/पुनर्परीक्षा बाबत मार्गदर्शक सूचना sanklit board exam

गुणपत्रकाबाबत सूचनाः

१) शेरा या स्तंभामध्ये विषयनिहाय उत्तीर्ण/अनुत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करण्यात यावी.

२) कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी दोन्ही सत्रांचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे या विषयांच्या बाबतीत दिनांक २० ऑगस्ट २०१० च्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयातील १०.२ मधील श्रेणी पध्द्तीनुसार श्रेणी देण्यात यावी. गुणपत्रकावर गुण देण्यात येऊ नयेत.

३) पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये कला, कार्यानुभव, आरोग्य व शा. शिक्षण यांच्या श्रेणीची नोंद घेऊ नये.

४) वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल, असा शेरा देण्यात यावा.

५) संबधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकालादिवशीच गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे.



 इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धतीः-

१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षाः-

१) इयत्ता ५ वी व ८ वी साठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दि. २० ऑगस्ट, २०१० अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

२) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन २ हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल.

३) मात्र संकलित मूल्यमापन १ चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल.


७) कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी शासन निर्णय दि. २० ऑगस्ट, २०१० अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे, या विषयांसाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही.

८) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राचे अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळास्तरावर करण्यात यावे.

९) सत्राअखेरीस अन्य इयत्तांसोबतच इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी इयत्तांचाही निकाल जाहीर करण्यात करण्यात यावा.

 इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी वर्गोत्रती निकषः-

१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा यांचे प्रती विषय एकूण गुण यांचे आधारावर उत्तीर्ण / अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल.

२) इयत्ता ५ वी साठी प्रती विषय किमान १८ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.

३) इयत्ता ८वी साठी प्रती विषय किमान २१ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.

४) गुणपत्रकामध्ये श्रेणी ऐवजी गुण देण्यात येतील.

५) वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल.

६) इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी तील विद्यार्थी अनुतीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल.

७) पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे. पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.

८) अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळास्तरावर ठेवण्यात याव्यात.

३) इयत्ता ५ वी व ८ वी साठी पुनर्परीक्षा:-

१) पुनर्परीक्षा केवळ इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी च्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल.

२) वार्षिक परीक्षेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला आहे, अशा विषयांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल.

३) कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांची पुनर्परीक्षा असणार नाही.

४) पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरविण्यात यावे.


६) पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रामधील अभ्यासक्रम / पाठ्यक्रम / अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल.

७) वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही.

८) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात. विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात.

९) नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल, यादृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळांनी करावी. जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा.

१०) पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एका पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल. (वर्मोन्नती दिली जाणार नाही)

११) पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळेवर बंधनकारक राहील.

१२) पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्वतयारी केंद्रप्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांनी समन्वयाने केंद्रस्तरावर अथवा शाळास्तरावर करावी.

१३) इयत्ता पाचवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान १८ गुण (३५%) विद्यार्थ्याने प्राप्त करणे अनिवार्य आहे.

१४) इयत्ता आठवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान २१ (३५%) गुण विद्यार्थ्याने प्राप्त करणे अनिवार्य आहे.

१५) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी तील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील.

४) सवलतीचे गुण :-

अ) वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परिक्षा / तत्सम गुणासाठी सवलतीचे गुणः-

१) वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या / अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासावर वाढीव सवलतीचे गुण (Grace Marks) देय असतील. एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल १० गुण देता येतील. कमाल तीन विषयांसाठी विभागून असे गुण देता येतील मात्र एका विषयासाठी कमाल ०५ गुण देता येतील.

२) सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावेत.

२) वानुरूप रूप वर्गात प्रवेशः-

१) इयत्ता ५ वी पर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात येईल.

२) इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गात वयानुरूप प्रवेश द्यावयाचा असेल तर त्या विद्यार्थ्यास इयत्ता ५ वी ची वार्षिक / पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

३) विद्यार्थी पाचवी इयत्तेची वार्षिक परीक्षा/पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत वयानुरूप प्रवेश विद्यार्थी घेणार आहे, अशा शाळेने इयत्ता ५ वी वर्गासाठीच्या पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्यांसाठी अशा तत्सम परिक्षेचे आयोजन करावे व सदर परीक्षेचा तात्काळ निकाल प्रसिद्ध करावा. अशा तत्सम परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यास वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात यावा. अथवा तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यास इयत्ता ५ वी च्याच वर्गात प्रवेश देण्यात यावा.

४) इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गात वयानुसार प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ५ वी ची वार्षिक परीक्षा / पुनर्परीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढण्यात याव्यात. यासाठी अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील असेल. यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या वेबसाईट वरील प्रश्न पेढी व नमुना प्रश्नपत्रिका यांचा आधार घेता येईल. अशा विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षेप्रमाणे किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यकता असल्यास परीक्षा अथवा पुनर्परीक्षाप्रमाणे सवलतीचे गुण देय असतील.

५) वयानुरूप प्रवेशित बालक द्वितीय सत्रात उशिराने दाखल झाल्यास त्यास वार्षिक परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येईल.

अमूल्य सुचना:-

१) विद्यार्थी इयत्ता ५ वी किंवा ८ वी मध्ये अनुत्तीर्ण झाला म्हणून अथवा कोणत्याही कारणास्तव त्यास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

२) इयत्ता ५ वी व ८ वी साठी शाळास्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा घ्याव्यात. तसेच उत्तरपत्रिका तपासणी करून शाळास्तरावर विहित कालावधीत निकाल प्रसिद्ध करावा.

३) विद्यार्थी इयत्ता ५ वी किंवा 2 वी च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास तसेच त्याने शाळा बदलण्याचा निर्णय घेतल्यास तो ज्या शाळेत प्रवेशित होईल त्या शाळेने त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी,

४) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत दि. १६ ऑक्टोंबर २०१८ च्या शासन निर्णयातील त्यांच्या
अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलतीबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात यावी.

५) सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्यमंडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहील.

६) याव्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व मंडळांनी इयत्ता ५ वी व ८ वी च्या परीक्षधावत संदर्भ क्र. ६ नुसार कार्यपद्धती निश्ति करावी.

७) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत वार्षिक परीक्षा / पुनर्परीक्षा यासाठी नमुना प्रश्नपत्रिका, प्रश्रपेढी, प्रश्नपत्रिका भारांश इत्यादीबाबत वेगळ्याने सूचना आवश्यकतेनुसार निर्गमित करण्यात येतील.

८) संकलित मूल्यमापनासाठी १ साठी प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करण्यात याव्यात.

९) वार्षिक परीक्षा/पुनर्परीक्षा प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करण्यात याव्यात.

१०) सदर मूल्यमापन कार्यपद्धती केवळ इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी लागू राहील. उर्वरित इयत्तांच्या मूल्यमापनासाठी शासन निर्णय दि. २० ऑगस्ट २०१० नुसार सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धत्तीचा अवलंब करावा.

११) सदर मूल्यमापन कार्यपद्धती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू राहील.

१२) त्यांचे साठी प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धत्ती लागू असेल.

१३) गुणपत्रक नमुना (परीक्षा व पुनर्परीक्षा) परिशिष्ठ १ व २ मध्ये देण्यात आलेला आहे.



 संदर्भातील  शासन निर्णय आपण खाली सविस्तर वाचू  शकता.

                                                     



वरील शासन निर्णय आपण खालील click here बटनाला क्लिक करून डाउनलोड करू शकता.

                                                     

Post a Comment

0 Comments