मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 " हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत.
विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
शासन निर्णय, दिनांक २६ जुलै, २०२४ अन्वये सन २०२४-२५ मध्ये देखील मागील वर्षीप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा-टप्पा २' हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २० हे अभियान दि.५ ऑगस्ट २०२४ ते दि.०६ सप्टेंबर २०२४ या कालावधी दरम्यान शाळांमध्ये राबविण्यात आले आहे. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी १९ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार शाळांचे प्रत्येक स्तरावर काटेकोरपणे समित्यांकडून मूल्यमापन होऊन या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. दिपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रयम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला १२ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानाच्या दुसऱ्या टप्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येयोल प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दिपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिलं जाणार आहे.
राज्य पातळीवरील निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय तसंच ८ विभाग पातळीवर निवड आलेल्या प्रयम, व्दितीय व तृतीय व बृहन्मुंबई आणि मनपा गट-अ व ब यांचे गटातून निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय अशा एकूण ६६ शाळांना पुरस्कार प्रदान कार्यक्रम राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. मंत्री (शालेय शिक्षण) महाराष्ट्र राज्य, यांचे हस्ते सोमवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए), एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईट. मुंबई ४०००२ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
शाळांना विविच स्तरावर विविध गटातून दिल्या जाणा या पुरस्कार रक्कमेचा तपशील सोबत जोडला आहे. तसेच शासकीय आणि खाजगी शाळा वर्गवारीतील राज्य आणि विभाग स्तरावरील विजेत्या ६६ शाळांची यादी सोबत मोडली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 " या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलेले आहे.
तरी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात राज्यस्तरावर, विभाग स्तरावर प्रथम आलेल्या शाळा आपण खाली pdf मध्ये पाहू शकता.
राज्यात व विभागात प्रथम आलेल्या शाळा आपण खालील प्रपत्रात पाहू शकता.
0 Comments