काेव्हीड लसीचे दाेन्ही डाेस झालेल्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी किंवा इतरत्रही दाखविण्यासाठी लागणारा Universal Travel Pass (ई पास)

 काेव्हीड लसीचे दाेन्ही डाेस झालेल्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी किंवा इतरत्रही दाखविण्यासाठी लागणारा Universal Travel Pass (ई पास) खालील लिंक वरून मिळेल.

सदरील लिंकवर जाण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा. 



यानंतर चित्रात दाखविल्याप्रमाणे टॅबवर क्लिक करा. 

Universal pass for double vaccinated citizens



 काेविन साईट प्रमाणेच तुमचा माेबाईल क्रमांक टाकल्यायावर एक OTP येईल. ताे एंटर केल्यानंतर आपले नांव , लस कधी घेतली इ. माहीती तिथे दिसते.












त्यानंतर जनरेट पास यावल क्लिक करा. तुम्हाला तुमचा पास जनरेट करण्याची प्रक्रिया सुरु होईल. 


त्याखाली choose file असा एक पर्याय आहे. तिथे तुमचा फाेटाे अपलाेड करावयाचा आहे. त्यासाठी तुमचा आेळखपत्रावर चालेल असा फाेटाे माेबाईल मध्ये किंवा कॉंप्युटरमध्ये अगाेदरच निश्चित करून ठेवा. कारण अपलाेड करण्यासाठी केवळ साठ सेकंदांचा वेळ दिला जाताे.



हा फाेटाे अपलाेड केल्यावर त्याखालील Apply बटनवर क्लीक करा.



तुम्हाला ई पास कधी प्राप्त हाेईल याचा संदेश तिथे दिसेल. हे आेळखपत्र पुढे बऱ्याच ठिकाणी लागेल. तेव्हा त्याची एक प्रत छापून जवळ ठेवा


त्यानंतर view Pass या बटनावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा पास दिसेल. 



ही प्रक्रिया तुम्ही माेबाईलप्रमाणेच कॉंप्युटरवरून/laptop वरून करू शकता.


Disclaimer : सदर माहिती केवळ आपल्या सोयीसाठी ठेवलेली आहे. 



Post a Comment

1 Comments