वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ मुदत वाढ बाबत…
विषय:- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२२ बाबत…
संदर्भ :- १) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./२१-२२/२२३८ दिनांक ०१.०६.२०२२. २) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ आय.टी./वनिप्र सूचना /२२-२३/२८५२ दिनांक १५.०६.२०२२.
उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ दिनांक ०१ जून २०२२ पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे. राज्यात एकूण ९४,५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४.०७.२०२२ रोजी पर्यंत ५२,५५१ प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी ●
आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करावे.
तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार या मध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे, अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण
सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.
तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक २५ जुलै,२०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद घेण्यात यावी. सदर सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्याप्रशिक्षणार्थी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच प्रशिक्षणाच्या सर्व अद्ययावत सूचना या https://training.scertimaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण
आज दि. १४ जुलै २०२२ रोजी पर्यंत ५२५५१ प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
पोर्टल बंद करण्याची अंतिम तारीख याबाबत कोणतीही सूचना अद्याप देण्यात आलेली नाही. अंतिम तारखेपूर्वी किमान ८ दिवस आधी पत्राद्वारे सर्वांना सूचित करण्यात येईल.
उर्वरत प्रशिक्षणार्थी यांनी आपले प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करावे.
राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ हे infosys springboardया app वरून होणार आहे. सदरील app डाऊनलोड करण्खायासाठी खालिल चित्राला क्लिक करा.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
महत्वाचे :-
- सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार आहे.
- सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
- प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत.
- सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ कसे पूर्ण करावे हे जाणून घेण्यासाठी व वरील pdf डाऊनलोड करण्खायासाठी खालिल चित्राला क्लिक करा.
0 Comments