स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - 15 august speech in marathi :
मित्रांनो दरवर्षी देशभरात 15 ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात. स्वतंत्र दिनाच्या या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने भाषण (Independence Day Speech in Marathi) द्यायला हवे. भाषणाची ही संधी हातातून जाऊ द्यायला नको.
आजच्या 15 august speech in marathi या लेखात आम्ही स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपयोगात घेण्यासाठी काही स्वतंत्र दिनाचे भाषण - Independence day Speech in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे 15 ऑगस्ट भाषण आपण आपल्या वहीत लिहून घेऊ शकतात आणि यामध्ये योग्य बदल करून स्वत चे भाषण तयार करू शकतात.
15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech in Marathi
आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो.
जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे.
ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे.
आजचे माझे भाषण येवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकुन घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत
धन्यवाद...
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाषण क्रमांक - २
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
मित्रहो 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा, स्वाभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले.
त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही.
चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला म्हणावेसे वाटते की,
तिरंगा आमुचा ध्वज,
उंच उंच फडकवू…
प्राणपणाने लढून आम्ही,
शान याची वाढवू…
धन्यवाद!
भारत माता की जय ! वंदे मातरम !
===================================
भाषण क्रमांक - ३
सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस.
आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.
15 ऑगस्ट 1947 ... होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.
भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता , त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे.
15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.
याच कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले.
लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.
टिळक यांच्यां नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढा च्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, याप्रमाणे अनेक लढे व सत्याग्रह केले.
त्याचप्रमाणे भगतसिंग राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवून आणले.भगतसिंग व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास मारण्याचा बेत केला.
परंतु नजरचुकीने दुसऱ्याचा अधिकाऱ्याची हत्या केली, अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग राजगुरू सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली.
त्यानंतर काकोरी कट, मीरत कट,चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो बांधव आंदोलन सुरू झाले. यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केला.
आठ ऑगस्ट रोजी गांधींजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले . आणि नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय ना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले.यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधील प्रमुख नेत्यांना अटक झाली.
परंतु प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने जनतेने स्वतः चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व देशभरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अबाल वृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आले या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत जनतेला ने मार्गदर्शन केले.
अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या जोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947च्या स्वातंत्र्यप्राप्ती ने झाला. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही रम्य पहाट उगवली आणि दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत च्या शृंखलेत जखडलेला भारत स्वतंत्र झाला.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तेथे भारतातील तिरंगा फडकवण्यात आला.
अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 76 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.
आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे.
परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया, मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे.
आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून सर्व, आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत.
1 Comments
Aarya
ReplyDelete