बदली प्रोफाईल अपडेट PHASE 1 आणि PHASE - 2 बदल माहिती
शिक्षक बदली संदर्भात आजची महत्वाची अपडेट :-
शिक्षक बदलीमध्ये आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी 20 जून 2022 ही अंतिम तारीख होती. ती आता वाढवून 27 जून 2022 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
शिक्षक बदलीबाबत आजचे अपडेट.
1) शिक्षण सेवक वगळता उर्वरित सर्व शिक्षक यांना बदली हवी असेल अगर नसेल ,परंतु प्रत्येकाने आपले प्रोफाईल अपडेट आजच करायचे आहे.
2) ज्यांचे प्रोफाईल BEO लॉगीन इन वरुन verify करुन परत पाठवले आहे ,त्यांनी verification accept करा.
👉🏼Accept केलेला screenshot केंद्रप्रमुख यांना शेअर करा केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शिक्षकांचा follow up घ्यावा लागेल.
3) तालुक्यातील सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल अपडेट करुन तो screenshot केंद्रप्रमुख यांना पाठवायचा आहे.
💠प्रत्येक शिक्षक यांनी प्रथम स्वतःचे प्रोफाईल खात्रीपूर्वक update करणे. ( शिक्षक प्रोफाईल अपडेट करण्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. )
पोर्टलवरील सर्व सूचना सतत लॉगीन इन करुन तपासणे.
💠BEO LOG in वरुन आपले प्रोफाईल verify केल्यानंतर आपल्याला text मेसेज / मेल येईल. टेक्स्ट मेसेज /मेल सतत चेक करा. यावेळी तिथे केशरी रंगाचे प्रश्नचिन्ह येईल.
💠 आपल्याला verification text message /mail आल्यानंतर आपण पुन्हा पोर्टलवर जाऊन आपले प्रोफाईल accept करा. त्यानंतर आपल्या नावापुढे हिरवी टिक येईल.
💠 आपले प्रोफाईल अपडेशन हिरवी टिक आल्यानंतर पूर्ण झालेले आहे.
💠 ज्यांनी लिंकवरुन दुरुस्ती कळवली आहे , त्यांनी आधार नंबर update झाले नसेल तरीही प्रोफाईल update करा. याव्यतिरिक्त (जन्मदिनांक, E-mail id दुरुस्ती दिसत नसेल तर पोर्टलवर तपासत रहा. बदल झाल्यानंतर प्रोफाईल update करा)
✅ कार्यालयाकडून /बदलीचे काम करणाऱ्या व्यक्तीचे फोन रिसिव्ह करावेत. आवश्यक माहिती,आपले अर्ज इ. सूचनांनुसार कार्यालयाकडे तात्काळ सादर करा.
शिक्षकांनी माहिती कशी भरावी हे खालील व्हिडीओ मह्द्ये पहा.
शिक्षक बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करणे.
बदली पोर्टलला शिक्षक प्रोफाईल अपडेट करणे सुरू झाले आहे. त्यात खालील प्रमाणे माहिती अपडेट करायची आहे.यात दोन पेजवर माहिती दुरुस्त करायची आहे.
1️⃣ प्रथम पान वरती पर्सनल डिटेल्स (Personal Details )
1) नाव
2) जन्मतारीख
3) लिंग
4) मोबाईल नंबर
5) आधार नंबर
6) पॅन नंबर
7) ई-मेल आयडी
8) शालार्थ नंबर
9) वैवाहिक स्थिती
हि माहिती आपणास चेक करावयाची आहे. या माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास तो आपणास करता येणार नाही. त्यासाठी गट शिक्षण कार्यालयाशी संपर्क करावा.
2️⃣ एम्प्लॉयमेंट डिटेल्स ( Employment Details )
1) जिल्हा परिषदे मधील नियुक्ती दिनांक
▶️ मूळ नेमणूक दिनांक
2)जात प्रवर्ग
▶️ जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे
3)नियुक्ती दिलेल्या जातीचा प्रवर्ग
▶️ तुम्हाला ज्या प्रवर्गातून नियुक्ती दिली आहे तो प्रवर्ग लिहायचा आहे.
4) कार्यरत जिल्हा परिषद मधील उपस्थिती दिनांक
▶️ जिल्हा बदली असेल तर दिनांकात बदल होईल. जिल्हा बदली नसेल तर सुरुवातीला एक नंबरला लिहिलेली तारीख असेल.
5) शाळेचा यु डायस नंबर
▶️सध्या आपण कार्यरत असलेल्या शाळेचा यु डायस नंबर लिहायचा आहे.
6) सध्याच्या शाळेतील उपस्थिती दिनांक
▶️ हि माहिती आपणा सर्वांना भरावयाचे आहे.
सध्याच्या शाळेत आपण ज्या तारखेस उपस्थित झालो आहोत की तारीख लिहायची आहे.
7) टीचर टाईप
▶️ सहशिक्षक
पदवीधर
मुख्याध्यापक
( योग्य पर्याय निवडावा )
8) अध्यापनाचा विषय
▶️ पदवीधर असेल तर आपला जो विषय आहे तो नमूद करावा.
9) शिकविण्याचे माध्यम
▶️ मराठी
शिक्षक बदली पोर्टल संदर्भात सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
10) लास्ट ट्रान्सफर कॅटेगिरी
▶️cadre -1
💥संवर्ग 1 मधून यापूर्वी बदली झाल्यास हा पर्याय निवडावा.
▶️Cadre -2
💥संवर्ग 2 मधून यापूर्वी बदली झाल्यास हा पर्याय निवडावा.
▶️Entitled
💥दुर्गम भागातील शिक्षकांसाठी हा पर्याय लागू आहे आपल्यासाठी नाही.
▶️Eligible
💥 संवर्ग-4 मधून बदली झाली असल्यास हा पर्याय निवडावा.
▶️NA
ऑनलाईन बदली झाली नसल्यास हा पर्याय निवडावा.
11) लास्ट ट्रान्सफर टाईप
▶️Inter District
आंतरजिल्हा बदली
(एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )
▶️Intra District
जिल्हा अंतर्गत बदली ( जिल्ह्यांमधीलच बदली )
▶️NA
बदली नाही झाल्यास हा पर्याय निवडावा.
शिक्षक बदली प्रोफाईल स्टेप बाय स्टेप माहिती pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.
शेवटी सेव्ह वरती क्लिक करावे.
आपली प्रोफाईल आपणास पहावयास मिळेल त्यानंतर सबमिट वरती क्लिक करावे.
तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा व आपला फॉर्म सबमिट करावा.
शेवटी आपला फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येईल.
शिक्षक बदली पोर्टल संदर्भात सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
0 Comments