संवर्ग २ चे बदलीचे फॉर्म भरण्यासाठी सुरु होत आहेत. त्यांनी त्याचे पसंती क्रम भरावयाचे आहेत.
यासाठी खालील वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन व्हावे. वेबसाईटवर जाण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. किंवा खालील वेबसाईटवर क्लिक करा.
विशेष संवर्ग २ मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागा दिसणार आहेत.
लॉगीन झाल्यानंतर डाव्या मेनुमधील Application Form पर्याय निवडून Cadre 2 हा पर्याय निवडून आपले पसंती क्रम भरावे.
यात तुम्हाला सुरुवातीला भरलेली माहिती दिसेल. त्यात आपल्याला पती - पत्नी मधील अंतर व इतर माहिती दिसेल यात आपल्याला बदल करता येणार नाही.
त्यानंतर आपल्याला आपले शाळांचे पसंतीक्रम भरावयाचे आहेत. कमीत कमी एक व जास्तीत जास्त ३० शाळा देता येणार आहेत. परंतु कमीत कमी एक पर्याय भरणे बंधनकारक आहे.
शाळा निवडल्यानंतर प्रत्येक वेळी save करा. शेवटी आठवणीने आपला फॉर्म Submit करा.
यासंदर्भात सविस्तर व्हिडीओ खाली देण्यात आलेला आहे. तो आपण काळजीपूर्वक पहावा.
खाली दिलेला व्हिडीओ काळजीपूर्वक पहा.
विशेष संवर्ग १ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत एकदा रिक्त पदांची यादी जाहीर होणार आहे.
महत्वाचे :-
विशेष संवर्ग २ मधील शिक्षकानाही त्यांचे पसंतीक्रम भरण्यासाठी ४ दिवसाचा कालावधी देण्यात येणार आहे.
29 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर रिक्त शाळांच्या याद्या घोषित केल्या जातील.
30 डिसेंबर - 30 डिसेंबर पासून संवर्ग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होईल.
Disclaimer :- सर्व हक्क vinsys कंपनीच्या स्वाधीन आहेत.
0 Comments