मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा
अभियान
सदरील माहिती आपण खाली WORD file मध्ये डाउनलोड करू शकता.
१) शाळा व
परिसराचे सौंदर्यीकरण –
i) विद्यार्थ्यामार्फत
वर्ग सजावट व शाळा सजावट :-
- शाळेतील सर्व
विद्यार्थी वर्ग सजावट व शाळा सजावट करण्यासाठी अग्रेसर असतात. तसेच प्रत्येक वेळी
सगळ्यांनी मिळून या उपक्रमात सहभागी होतात.
ii) शाळेच्या
आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना –
शाळेच्या आवारात
पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण केले आहेत. तसेच त्यांची
जोपासना करण्यासाठी शालेय मंत्री मंडळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
iii) शाळेच्या
इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी –
ABL व BALA प्रमाणे शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आले आहे. उर्वरीत शिल्लक भाग
करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संरक्षक भिंती अर्धवट आहे
पूर्ण झाल्यावर रंगरंगोटी
करण्यात येईल.
iv) प्रबोधनात्मक
सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी –
शालेय परिसरात, वर्गात प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची
उभारणी करण्यात आली आहे. शालेय इमारतीचे काम सुरु असल्याने कांही कामे शिल्लक
आहेत.उर्वरित भाग पूर्ण करण्यात येईल.
२) विद्यार्थ्याचा
विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील
सहभाग :-
i) विद्यार्थी
मंत्रिमंडळ /बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे –
शाळेतील कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन
करण्यात आले आहे. तसेच प्रत्येकांना त्यांची जबाबदारी सांगण्यात आली आहे. विद्यार्थी
मंत्रिमंडळ दैनंदिन आपले कामकाज व्यवस्थितपणे पाहतात व कार्यवाही करतात.
ii) प्रधानमंत्री
पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील
विद्यार्थ्यांचा सहभाग –
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने जि.प.शाळा पांढरेवाडी शाळेत योग्य नियोजन व
अंमलबजावणी करून अंडी व केळी दिली जाते तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग १०० % आहे.
iii) प्रधानमंत्री
पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून
त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग –
जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा पांढरेवाडी शाळेत पाणी नसल्या कारणाने परसबाग
करता येत नाही. परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या परसबागेत भाज्या
लावण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
iv) मेरी
माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग –
जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा पांढरेवाडी शाळेतील विद्यार्थी , पालक व
शिक्षक मेरी माटी मेरा देश या उपक्रमात
सहभागी झाले आहेत.
v) शाळेची
बचत बँक/पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग –
आमच्या जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा पांढरेवाडी शाळेची बचत बँक नाही
– उपलब्ध नाही.
vi) नवभारत
साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग –
नवभारत साक्षरता अभियान संदर्भात कारवाही सुरु आहे. शाळेचा सहभाग आहे.
३) शैक्षणिक गुणवत्ता
व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम :-
i) विद्यार्थ्यांच्या
शाळेतील उपस्थितीचे प्रमाण –
जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा पांढरेवाडी शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचे
प्रमाण ९० % पेक्षा जास्त असते. १०० % उपस्थिती होण्यासाठी पालक भेटी
घेण्यात येते.
ii) महावाचन
चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग –
इयत्ता पाहिली ते आठवीतील विद्यार्थी
महावाचन चळवळीत सहभाग घेतात.सुट्टीच्या वेळेत वाचन करतात तसेच प्रत्येक
शनिवारी वाचन घेतले जाते.
iii) वक्तृत्व
स्पर्धा/लेखन स्पर्धा/ संगीत स्पर्धा/ इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील
विद्यार्थ्यांचा सहभाग –
दैनंदिन आनंददायी तासिकेच्या माध्यमातून हे सर्व उपक्रमाचे आयोजन करून
अंमलबजावणी करत आहोत. विद्यार्थी सहभाग चांगला आहे. शिक्षक तसेच विद्यार्थी
यांच्या सहकार्याने कारवाही सराव केला जातो.
iv) यथास्थिती
NCC/Scout Guide / MCCव समान प्रकारच्या इतर उपक्रमातील
विद्यार्थ्यांचा सहभाग –
Scout Guide उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
४) शाळेची इमारत व
परिसराची स्वच्छता :-
i) स्वच्छता
मॉनिटर अभियान-टप्पा-२ मधील सहभाग –
जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा पांढरेवाडी शाळेची स्वच्छता मॉनिटर
अभियान-टप्पा-२ संदर्भात रजि. करण्यात आले आहे व कारवाही सुरू आहे. ग्राम पंचायत
पांढरेवाडी यांच्या मार्फत कचरा कुंडी प्राप्त झाले आहेत. तसेच गावत हा उपक्रम
सार्वजनिक पद्धतीने राबवत आहेत.
५) राष्ट्रीय
एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम :-
i) प्रत्येक
शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे- पेहराव,
खानपान, सण-उत्सव इत्यादी बाबत तसेच
राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शविणारे सादरीकरण –
शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात या संदर्भात सादरीकरण केले जाते. कर्नाटक
राज्यातील पेहराव केले गेले.
६) विविध
क्रीडास्पर्धांचे आयोजन :-
i) विविध
क्रीडास्पर्धांचे आयोजन:- यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य –
स्थानिक पातळीवर खेळले जाणारे खेळ व विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले
जाते तसेच जि.प.उच्च प्रा.मराठी शाळा पांढरेवाडी शाळेचे यश जिल्हा स्तरा पर्यंत
प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी नेहमी अग्रेसर असतात व नेहमी सराव
करतात.
ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील
विविध घटकांचा सहभाग
१) आरोग्य :-
i) विद्यार्थी
व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबीर यात आरोग्याची
सर्वसाधारण तपासणी –
१०० % विद्यार्थी व शिक्षक यांची आरोग्य
तपासणी झाली आहे.
ii) शाळेत
प्रथमोपचार पेटीची उपलब्धता –
शाळेत प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे. त्याचा वापर केला जातो.
iii) बदलत्या
जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा,मधुमेह व
डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी
तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान –
वरील विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले नाही परंतु आरोग्य कर्मचारी व
शिक्षक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.
iv) किशोरवयीन
विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन –
किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे
आयोजन करण्यात आले व याबाबतीत आरोग्य कर्मचारी व शिक्षक यांच्या मार्फत समुपदेशन
करण्यात येते.
v) हात
स्वच्छ धुवण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा –
हात स्वच्छ धुवण्याचे योग्य क्रम तसेच प्रात्यक्षिक कृती घेण्यात येते.
त्यासाठीची सुविधाउपलब्ध आहे.
२) आर्थिक साक्षरता व
कौशल्य विकास :-
i) विद्यार्थ्यामध्ये
शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकाचे व्यवहार, कर्ज
व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ
व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान –
शाळेतील शिक्षकांकडून आर्थिक साक्षरता, बँकाचे व्यवहार, कर्ज व व्याज
प्रणाली, upi बाबतीत माहिती
दिली जाते.
ii) स्वयंरोजगार
व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा
क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय
शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर
व्याख्यान- यात अशा अभ्यासक्रमांची ओळख, शिक्षण देणाऱ्या
संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील
संधी इत्यादीबाबतची माहिती असावी –
तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यान घेण्यात आले नाही परंतु
शिक्षकांकडून माहिती दिली जाते.
३) भौतिक सुविधा बाबत,
खाजगी संस्था, व्यक्ती ,कंपनी
यांचा सहभाग व शाळा व्यवस्थापन समिती :-
i) भौतिक
सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित
करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरुपात अधिकाधिक
देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न –
शैक्षणिक साहित्य व वस्तू स्वरुपात देणगी गोळा करण्यात आले आहे. तसेच
त्याचा वापर देखील करण्यात येत आहे.
ii) शाळा
व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज –
शाळेत पाण्याची सोय करण्यासाठी बोरवेल मारण्यात आले. तसेच वस्तू स्वरुपात
देणगी देण्यात अग्रेसर असतात.
४) तंबाखू मुक्त ,प्लास्टिक मुक्त पर्यावरण, शिल्लक अन्न प्रक्रिया
विल्हेवाट :-
i) तंबाखू
मुक्त शाळा :- शाळेपासून किमान २०० मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या
विक्रीस बंदी –
तंबाखू मुक्त शाळा अभियानात सहभागी आहे. तसेच शाळेपासून किमान २०० मीटर
अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी आहे व या संदर्भात बोर्ड लावण्यात आलेला आहे.
ii) प्लास्टिक
मुक्त शाळा :- पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात
अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता –
प्लास्टिक मुक्त शाळा प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात
होणार नाही या संदर्भात नियोजन व कार्यवाही सुरु आहे.
iii) प्रधानमंत्री
पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण
आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव
उपक्रम –
पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात
येते.
५) शाळेचे माजी
विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी
संस्थाचा शाळा उपक्रम सहभाग
i) उपरोल्लेखित
विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम
यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्याठिकाणी अधिकाधिक सहभाग
माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था
यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमात सहभाग असतो.
वरील माहिती WORD file मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
0 Comments