विषय : STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ देणे बाबत..
संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र. राशैसंप्रपम/संशोधन/ ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५ दि.०९/१०/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.
सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दि.११.१०.२०२४ ते दि.२०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या अत्यल्प असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दि.३०.११.२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.
ब्लेंडेड मोड कोर्स लिंक
ब्लेंडेड मोड कोर्स १
https://diksha.gov.in/explore-course/course/do31387725641505996812829
ब्लेंडेड मोड कोर्स २
https://diksha.gov.in/explore-course/course/do31387794833530060814730
ब्लेंडेड मोड कोर्स ३
https://diksha.gov.in/explorecourse/course/do31387700403201638413856
ब्लेंडेड मोड कोर्स ४
https://diksha.gov.in/explorecourse/course/do31387718697990553612625
ब्लेंडेड मोड कोर्स ५
https://diksha.gov.in/explorecourse/course/do31387772756049100813393
ब्लेंडेड मोड कोर्स ६
https://diksha.gov.in/explorecourse/course/do31387794833530060814730
ब्लेंडेड मोड कोर्स ७
https://diksha.gov.in/explorecourse/course/do_31387734393575833613177
ब्लेंडेड मोड कोर्स ८
https://diksha.gov.in/explore-course/course/do31387712181953331214014
ब्लेंडेड मोड कोर्स ९
https://diksha.gov.in/explore-course/course/do31387712181953331214014
ब्लेंडेड मोड कोर्स १०
https://diksha.gov.in/explorecourse/course/do_31387741797257216013307
ब्लेंडेड कोर्स शिक्षकांसाठी सूचना :
1. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी सदर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स साठी नोंदणी करावी.
2. सदर कोर्स मराठी माध्यमात उपलब्ध आहेत तथापि इतर माध्यमातील शिक्षक हा कोर्स करण्यास इच्छुक असल्यास सदर कोर्सला नोंदणी करू शकतात व तो पूर्ण करू शकतात.
3. इयत्ता पहिली ते आठवी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तर कोर्स साठी नोंदणी करावी.
4. इयत्ता नववी व दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक स्तर कोर्ससाठी नोंदणी करावी
5. सद्यस्थितीत एका शिक्षकाला एका वेळी एकाच कोर्ससाठी नोंदणी करता येईल.
6. सदर कोर्स पूर्ण करताना कोर्समधील सर्व व्हिडीओ पूर्णपणे पाहून विषयाची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावरच मूल्यमापनासाठी प्रश्न्न उपलब्ध होतील.
7. सदर ब्लेंडेड कोर्समध्ये पाच तास व्हिडिओ अवलोकन, मूल्यमापन व एक दिवसांची PLC पूर्ण करणे अनिवार्य आहे
8. NEP २०२० च्या निर्देशानुसार सदरचा एक कोर्स पूर्ण केल्यानंतर एका शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) आवश्यक ५० तासांपैकी १० तास ग्राह्य धरण्यात येतील.
9. PLC सह कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना कोर्स पूर्णत्वाचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळेल व प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येईल.
10. ब्लेंडेड कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर शिक्षक पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात वेतील.
गटसाधन केंद्र/शहर साधन केंद्र (BRC/URC) स्तरावरील समन्वयकांची भूमिका व जबाबदारी :
1. राज्यस्तर/जिल्हास्तर वरून प्राप्त झालेल्या ब्लेंडेड कोर्स संदर्भातील पत्रांनुसार कार्यवाही करणे.
2. आपल्या बीआरसी युआरसी कार्यक्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्सला नोंदणी करण्यासंदर्भातील पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे,
3. ब्लेंडेड कोर्ससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे विषयनिहाय व्हाट्सअप गट तयार करून कोर्स बाबत वेळोवेळी मार्गदर्शन, आढावा व सनियंत्रण करणे,
4. वरिष्ठ स्तरावरून कोर्स संदर्भातील आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार PLC चे आयोजन करणे.
5. पीएलसी च्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पीएलसी पूर्ण करणे.
6. सदर ब्लेंडेड कोर्स संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.
ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) यांची भूमिका :
1. शिक्षकांनी ब्लेंडेड कोर्स करण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे व शिक्षकांना प्रोत्साहन देणे.
2. ब्लेंडेड कोर्स संदर्भात नोंदणी, कोर्स माहिती, PLC माहिती बावत केंद्र स्तरावर उद्घोचन सत्र आयोजन करणे
3. ब्लेंडेड कोर्स मध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना सूचित करणे,
4. ब्लेंडेड कोर्स शिक्षकांच्या सीपीडी साठी तयार करण्यात आलेला असून जे शिक्षक कोर्स पूर्ण करतील त्यांच्या प्रमाणपत्राची नोंद आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेकडून सेवापुस्तकात घेण्याची कार्यवाही करणे.
5. जिल्हास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेने तालुकास्तरीय पीएलसीला भेटी देण्याचे नियोजन करणे,
व्लेंडेड कोर्स अंमलबजावणी मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची भूमिका :
1. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील माहिती जिल्हास्तरावरून व्हाट्सअप, पत्र, ई-मेलद्वारे शिक्षकापर्यंत प्रसारित करणे.
2. ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यामधून एक अधिकारी समन्ययक म्हणून नेमून त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपविणे.
3. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील राज्यस्तरावरून प्राम होणाऱ्या मार्गदर्शक सूचना, नियोजन BRC/URC पर्यंत पोहोचवणे,
4. ब्लेंडेड कोर्स संदर्भात जिल्हास्तरीय आढावा मार्गदर्शन व सनियंत्रण करणे,
5. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील तालुका संपर्क अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात पीएलसी चे नियोजन व आयोजन करणे,
6. तालुकास्तरीय पीएलसी भेटीसाठी नियोजन करणे.
0 Comments