माहे - मार्च 2022 पेड़ इन एप्रिल 2022 च्या वेतन बिलात करावयाचे 4 मुख्य बदल
दि. 30 मार्च 2022 च्या वित्त विभागाच्या शासन निर्णया नुसार माहे मार्च 2022 च्या वेतन बिलात खालील बदल करणे / फरक समाविष्ट करणे आवश्यक आहे..
१. माहे - मार्च 2022 च्या वेतनात 31% DA नुसार वेतन निश्चिती करणे..
DA 31% करण्यात आला आहे, त्यानुसार नियमित मार्च चे वेतन 31% DA नुसार कॅल्क्युलेट होऊनच शालार्थ मध्ये अपडेट होईल ...
२. माहे जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील 3 महिन्याचा 11% DA फरक वेतनात जमा करणे...
1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता (DA) 17% वरून 28% लागू करण्यात आला होता पण जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत चा फरक आदेश तेव्हा नव्हता तो आता निघाला आहे.. त्यामुळे 1जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 अखेर 3महिन्याचा (17% वरुन 28% या प्रमाणे) 11% DA फरक आता देण्यात येईल त्यामुळे तो 11% फरक आता जमा करावा...
३. माहे जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील 8 महिन्याचा 3% DA फरक वेतनात जमा करणे..
माहे- 1 जुलै 2021 पासून पुन्हा 28% वरून 31% असा DA वाढवण्यात आला आहे.. त्यामुळे 1 जुलै 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 अखेर चा 3% DA फरक (28% वरुन 31% ) ही पुन्हा या पगारात जमा करावा..
४. जुलै 2021 ते सप्टें 2021 पर्यंत चा 3 महिन्याचा HRA फरक add करणे..
5 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे ज्यावेळेस DA 25% च्या वर जाईल तेव्हा घरभाडे भत्ता X,Y,Z च्या प्रकारानुसार अनुक्रमे 1%, 2% व 3% वाढेत त्यामुळे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या घरभाडे भत्ता मध्ये पण 1%, 2% व 3% वाढ होणार आहे. त्यानुसार माहे जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्याचा HRA ८% वरून वाढ होऊन ९% नुसार काढावा लागेल. तसा फरक आपण ११% महागाई भत्ता वाढ फरक तक्त्यात केलेला आहे.
हे महत्वाचे प्रामुख्याने बदल करायचे आहेत. याची EXCEL फाईल आपण डाऊनलोड करून त्यात आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचा ३% नुसार मार्च महिन्याचा पगार, ३% महागाई भत्ता ८ महिन्याचा फरक व ११% नुसार महागाई भत्ता फरक ३ महिन्याचा अगदी सहज कॅल्क्युलेट करू शकता.
यासाठी आवश्यक माहिती फक्त
आपले नाव,
मार्च महिन्याचे बेसिक ,
आपला वाहतूक भत्ता
भरून आपल्याला प्रिंट काढण्यासाठी सहज फरक तक्ता तयार होईल.
=====================================================
हे हि महत्वाचे
३% वाढीव महागाई भत्यानुसार आपला पगार किती होईल ते एका मिनिटात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
११% महागाई भत्ता वाढीनुसार मागील ३ महिन्याचा फरक एका क्लिकवर मिळवा.
========================================================
खाली आपणास एका शिक्षकासाठी व दहा शिक्षकांची माहिती काढण्यासाठी वेगवेगळी फाईल बनविलेली आहे. सदरील EXCEL फाईल आपण डाऊनलोड करून त्यात आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचा ३% नुसार मार्च महिन्याचा पगार, ३% महागाई भत्ता ८ महिन्याचा फरक व ११% नुसार महागाई भत्ता फरक ३ महिन्याचा अगदी सहज कॅल्क्युलेट करू शकता.
दहा शिक्षकाची माहिती अवघ्या ५ मिनिटात सहज तयार करण्यासाठी व तयार होणारा तक्ता आपण सहज प्रिंट काढू शकता. यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. आपला वेळ वाचवा.
एका शिक्षकाची माहिती सहज तयार करण्यासाठी व तयार होणारा तक्ता आपण सहज प्रिंट काढू शकता. यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. आपला वेळ वाचवा.
0 Comments