पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) अंतिम निकाल व गुणवत्ता यादी | Scholarship-final-result

 


पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 12 फेब्रुवारी, 2023 अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती

शिष्यवृत्ती यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी

राज्यस्तरीय

Click Here

जिल्हा स्तरीय

Click Here

तालुकास्तरीय

Click Here

इयत्ता  ८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी

राज्यस्तरीय

Click Here

जिल्हा स्तरीय

Click Here

तालुकास्तरीय

Click Here


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता याद्या गुरुवार दि. 13 जुलै, 2023 रोजी सायं. 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.

दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (क.) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 29/04/2023 रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. 29/04/2023 ते 09/05/2023 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्याथ्र्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

अंतिम निकाल प्राप्त करणे.

शाळा login वरून निकाल पाहण्यासाठी click here बटनाला क्लिक करा. 


विद्यार्थी login वरून निकाल पाहण्यासाठी click here बटनाला क्लिक करा. 



सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतः चा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्याथ्र्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतः चा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता पाहता येईल.

संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्याथ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे

1. अंतिम निकाल (विद्याथ्यांसाठी)

2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय / तालुकास्तरीय)

3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकान्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

• गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.

1. शासनमान्य मंजूर शिष्यवृती संघांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण

गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी, 2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.

3. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी. 4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थीी.

5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.

• गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत

परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते ) गुणपत्रक दि. 29 एप्रिल, 2023 रोजी व अंतिम गुणपत्रक दि. 13 जुलै, 2023 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.

• महत्त्वाचे

1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची अर्हता रद्द केली जाईल.

3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्याथ्र्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी पत्ता

मा. शिक्षण संचालक (योजना)
शिक्षण केंद्र योजना,
17. डॉ. आंबेडकर रोड, पुणे - 411 001.

हे प्रसिध्दीपत्रक परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येत आहे.



वरील   pdf  डाऊनलोड करण्यासाठी click here बटनाला क्लिक करा. 

Post a Comment

5 Comments