विशेष संवर्ग भाग -१ बदली संपूर्ण माहिती ( Sanvarga-1-all-information )

 



खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग १ चे शिक्षक म्हणून गणले जातात. 

  • पक्षाघाताने आजारी शिक्षक 
  • दिव्यांग शिक्षक 
  • हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक 
  • जन्मापासून एकच मूत्रपिंड ( किडनी ) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक 
  • यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक 
  • कॅन्सरने ( कर्करोग ) आजारी शिक्षक 
  • थँँलेसमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात दोषांमुळे उद्भवणारे आजार 
  • माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी / विधवा 
  • विधवा शिक्षिका 
  • कुमारिका शिक्षक 
  • परित्यक्त्या / घटस्पोटीत महिला शिक्षक 
  • वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक 
  • स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात ( स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत )
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधीग्रस्त असे :- 
  1.  हृदय शस्त्रक्रिया झालेले 
  2. जन्मापासून एकच मूत्रपिंड ( किडनी ) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले
  3. यकृत प्रत्यारोपण झालेले 
  4. कॅन्सरने ( कर्करोग ) आजारी असलेले 
  5. मेंदूचा आजार झालेले 
  6. थँँलेसमिया विकारग्रस्त 

महत्वाचे :- 

  • विशेष संवर्ग १ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरूनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पत्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वंय घोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. 
  • विशेष संवर्ग अंतर्गत विनंती बदलीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील. 

  • एखाद्या विशिष्ट संवर्गा मध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाजेष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमता बदली अनुज्ञेय  राहील

  •  सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील


  • विशेष संवर्ग भाग - १  मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकारी याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रते बाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.


  • विशेष संवर्ग भाग - १  अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


  •  या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यासाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रम याप्रमाणे एकाही शाळेमध्ये (  तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने )  बदली देता आली नाही तर त्यांची बदली होणार नाही.





शिक्षक संवर्ग - १ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना खालीलप्रमाणे आहे. 






वरील शिक्षक संवर्ग - १ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 






=========================================

शिक्षक संवर्ग बदली ०७ एप्रिल २०२२ रोजीचा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.  





वरील शिक्षक संवर्ग बदली शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 






Post a Comment

1 Comments

  1. संवर्ग 1 मध्ये व्याधीग्रस्त जोडीदार मध्ये शासन निर्णय दिनांक 22-08-2019 नुसार समाविष्ट करणार नाहीत का...?

    ReplyDelete