संवर्ग 3 बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक ➖
बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाले असेल असे शिक्षक
१. अवघड क्षेत्र : परिशिष्ट 1 मध्ये नमूद असणाऱ्या सात बाबींपैकी किमान तीन बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव / शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.
परिशिष्ट - १ अवघड क्षेत्राचे निकष खालीलप्रमाणे आहेत ➖
नक्षलग्रस्त / पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव
वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव ( महसूल विभागाकडील माहितीनुसार )
हिस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश ( संबंधित उपवन संरक्षक यांच्या अहवालानुसार)
वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न जोडलेल्या शाळा ( बस, रेल्वे इतर सार्वजनिक वाहतूक )
संवाद छायेचा प्रदेश ( communication shadow aarea ) ( संबंधित महाप्रबंधक BSNL यांच्या अहवालानुसार )
डोंगरी भाग प्रदेश ( नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार )
राष्ट्रीय राज्य महामार्ग पासून दहा किमी पेक्षा जास्त दूर
वरील प्रमाणे जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीने दर तीन वर्षांनी ( मार्च महिन्यात ) पुनर्विलोकन करण्यात यावे.
मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष
उपजिल्हाधिकारी ( निवडणूक ) - सदस्य
कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग - सदस्य
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग - सदस्य
विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - सदस्य
शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) - सदस्य सचिव
विशेष वर्ग शिक्षक भाग - ३ यांच्या बदल्या ➖
टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
- यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षांची बदली करावयाचे निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झालेली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र एक मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
- सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्याबद्दल यासाठी पात्र धरावयाचा सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.
- सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.
- बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंती तील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
- बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदली पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.
शिक्षक संवर्ग - ३ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना खालीलप्रमाणे आहे.
वरील शिक्षक संवर्ग - ३ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
वरील शिक्षक संवर्ग बदली शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.
अत्यंत महत्त्वाचे ➖ हे हि वाचा
विशेष संवर्ग शिक्षक भाग - १ संपूर्ण माहिती
विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ संपूर्ण माहिती
विशेष संवर्ग शिक्षक भाग - 4 संपूर्ण माहिती
0 Comments