संवर्ग - ४ बदली माहिती व फॉर्म ( Special-category-four-form-and-information )

 







खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग ४ चे शिक्षक म्हणून गणले जातात. 


बदलीस पात्र शिक्षक ➖


 बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण  क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकांची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे वयाची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य सेवा जेष्ठता नुसार  आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रांमध्ये बदली करून पद्धत स्थापित करण्यात येईल.




महत्वाचे :- 

  बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती ➖


  • टप्पा क्रमांक एक, दोन, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीपात्र शिक्षक यांची एक सेवा जेष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल.

  •  सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.

  •  यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्याची चूक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदावर बदली होऊ शकते.

  •  या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांना बदलीने नियुक्ती केली जाईल.

  •  सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.










शिक्षक संवर्ग - ४ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना खालीलप्रमाणे आहे. 






वरील शिक्षक संवर्ग - ४ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 






=========================================

शिक्षक संवर्ग बदली ०७ एप्रिल २०२२ रोजीचा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.  





वरील शिक्षक संवर्ग बदली शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 





विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा 👍


 टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक 5 मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रम मध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक पाच ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमात प्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदली नियुक्ती केली जाईल. 



Post a Comment

0 Comments