विशेष संवर्ग भाग - २ संपूर्ण माहिती व फॉर्म ( special- category-2-form-and-information )

 





खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग २ चे शिक्षक म्हणून गणले जातात. 

पती-पत्नी एकत्रीकरण (  जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग - २  शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. )


  •  पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
  •  पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
  • पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर
  •  पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणात महानगरपालिका / नगरपालिका
  •  पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
  •  पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक /  कर्मचारी असेल तर


महत्वाचे :- 

 विशेष वर्ग शिक्षक भाग - २  यांच्या बदल्या ➖


  •  टप्पा क्रमांक दोन प्रमाणे कारवाई झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग - २  शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग - २  यांच्या बदल्या करण्यात यावेत.

  •  जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग - २  मध्ये मोडतात त्यांनी विवरण पत्र क्रमांक. ४  मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

  •  जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल.

  •  उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधितांची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा तीस किलोमीटर परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण दहा वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.

  •  तीस किलोमीटर रस्त्याचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग- कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.

  •  विशेष संवर्ग भाग - २  खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.











शिक्षक संवर्ग - २ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना खालीलप्रमाणे आहे. 






वरील शिक्षक संवर्ग - १ साठी आपली माहिती देण्यसाठी फॉर्म नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 






=========================================

शिक्षक संवर्ग बदली ०७ एप्रिल २०२२ रोजीचा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे.  





वरील शिक्षक संवर्ग बदली शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. 






Post a Comment

0 Comments