प्रकल्प म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या
अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी
आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध
असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम
म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची
उद्दिष्टे
1. स्वयंअध्ययनाची
सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन,
संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती,
श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा,
नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास
घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे.
उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर
क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
- Ø परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.
- Ø पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
- Ø बडबडगीते तोंडपाठ करणे.
- Ø चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
- Ø चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
- Ø उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
- Ø परिसरातील विविध स्थळांची माहिती .
- Ø वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
- Ø कथा व कवितांचा संग्रह करणे .
- Ø सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
- Ø वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
- Ø नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
- Ø निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
- Ø भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
- Ø स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
- Ø शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
- Ø गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
- Ø देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
- Ø विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
- Ø विविध पत्राचे नमुने जमा करणे.
- Ø अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
- Ø पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
- Ø शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
- Ø पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
- Ø तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
- Ø आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
- Ø आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
- वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
विषयानुसार प्रकल्प पाहण्यसाठी खालील विषयासमोर दिलेल्या Click here बटनाला क्लिक करा.
अ.क्र | वर्ग | इथे डाऊनलोड करा. |
१. | भाषा | |
२. | गणित | |
३. | इंग्रजी | |
4. | विज्ञान | |
५. | हिंदी | |
६. | इतिहास | |
७. | भूगोल | |
८. | 101 प्रकल्प यादी |
इयत्तानिहाय व विषयनिहाय pdf मध्ये प्रकल्प यादी डाऊनलोड करण्यासठी खालील click here बटनाला क्लिक करा.
1 Comments
Sanidhya nitin khillare
ReplyDelete